शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेश कार्यकारिणीची सांगलीतील बैठक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:43 IST

सांगली : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची येत्या ४ व ५ जून रोजी सांगलीत होणारी बैठक कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आता ही बैठक जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी आमदार सुरेश ...

सांगली : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची येत्या ४ व ५ जून रोजी सांगलीत होणारी बैठक कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. आता ही बैठक जूनच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी आमदार सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर, राजाराम गरुड, विक्रम पाटील उपस्थित होते.खा. पाटील म्हणाले की, महापालिका निवडणुकीपूर्वी सांगलीत राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संसदीय कामकाजमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह राज्यातील भाजपचे मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार होते. ४ जूनला स्टेशन चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले होते. या सभेत अनेकजण पक्षप्रवेश करणार होते. गेल्या आठ दिवसांपासून आम्ही तयारी सुरू केली होती. पण, गुरुवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भाजपची मोठी हानी झाली आहे. ते जनता पक्ष, जनसंघापासून पक्षाचे सक्रिय पदाधिकारी होते. शिवाय माजी प्रदेशाध्यक्षही होते. त्यांच्या जाण्याने ही कार्यकारिणी बैठक रद्द करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. तसे शुक्रवारी सकाळी कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता हे सर्व कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आली आहे.महापालिका निवडणुकीसाठी जूनच्या तिसºया आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ही बैठक आणि त्यानिमित्ताने भाजपचे शक्तिप्रदर्शन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या १५ व १६ जूनच्या दरम्यान राज्य कार्यकारिणी बैठक घेण्यासाठी आम्ही आग्रही राहणार असल्याचे पाटील म्हणाले.पक्षप्रवेशाचा स्वतंत्र कार्यक्रम घेणार : पाटीलमहापालिका निवडणुका आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह आम्ही सर्वजण एकदिलाने लढणार असून महापालिकेवर भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करीत खा. पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत अन्य पक्षांतून आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार होते. पण आता बैठक व सभाच रद्द झाल्याने प्रवेश लांबला आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीची प्रतीक्षा न करता स्वतंत्र पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कार्यकारिणी बैठकीपूर्वीच हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असेही त्यांनी सांगितले.